सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे तब्बल दीड महिन्याच्या रजेनंतर 21 जून रोजी पुन्हा आपल्या पदावर जॉईन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. जॉईन झाल्यानंतर लगेच ते आषाढी वारीच्या कामकाजात गुंतून जातील.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे एक महिन्याच्या आयएएस ट्रेनिंगसाठी 6 मे रोजी मसूरीला रवाना झाले त्यांचा 24 दिवसांचा ट्रेनिंग कालावधी होता, त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे देण्यात आला. 24 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर शंभरकर हे आपल्या कौटुंबिक कारणासाठी रजा घेऊन परदेशी गेले होते. दीड महिन्यात प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज सांभाळले आहे.
या दीड महिन्याच्या दरम्यान नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला शंभरकर येणार अशी चर्चा होती मात्र त्यांना येता आले नाही. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातून आता संपूर्ण कामकाज हे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांचे कार्यालय आहे.
दरम्यान शंभरकर हे रुजू झाल्यानंतर आषाढी वारी तोंडावर असल्याने ते आढावा घेऊनच आपले कामकाज सुरू करतील. कोरोनाच्या दोन वर्षाच्या गॅप नंतर 2022 या साली होत असलेल्या आषाढी वारीचे नियोजन शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री नसतानाही उत्तम नियोजन करुन वारी चांगल्या प्रकारे पार पाडली.

















