Nawab Malik : मोहित कंबोज यांची नवाब मलिक बाबत महत्वाची मागणी
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटात दाखल झाले आहेत. आज अधिवेशनामध्ये सहभागी झाल्यावर मलिक हे सत्ताधारी बाकावरील मागच्या बेंचवर बसले.
त्या पार्श्वभूमीवर मलिक यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नवाब मलिक यांच्याबाबत केलेल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणाले की, नवाब मलिक यांच्यासाठी हे नागपूरमधील शेवटचं विधानसभा अधिवेशन आहे. तुम्ही आता तुम्हाला वाटेल तिथे बसा, पण २०२४ मध्ये तुम्ही आमदार बनणार नाहीत, असा इशारा मोहित कंबोज यांनी या ट्विटमधून दिला आहे.
Supreme Court Should Cancel मियाँ नवाब मलिक bail , as bail was given only for medical treatment not to attend assembly session in Nagpur !
कचरा सेठ को देख के लगता है तबियत एक दम First Class है और कोई इलाज की ज़रूरत नहीं है !
Immediately he should be send back to Arthur Road Jail pic.twitter.com/3W9CmzNYjN— Mohit Kamboj Bharatiya ( Modi Ka Parivar ) (@mohitbharatiya_) December 8, 2023