सोलापुर शहर काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या अध्यक्षपदी राजेंद्र शिरकुल यांची निवड करण्यात आली. त्यांचे निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते जनवात्सल्य येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, मा. नगरसेवक रियाज हुंडेक़री, हाजी तौफ़ीक़ हत्तुरे, विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, शकील मौलवी, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, विवेक कन्ना, सैफन शेख, श्रीकांत वाडेकर, संजय गायकवाड़, सुभाष वाघमारे, शाहु सलगर, इलियास शेख बशीद इंगलगी, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी नूतन अध्यक्ष राजेंद्र शिरकुल यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयं रोजगार सेलचे अध्यक्ष योगेश मसलगे पाटील, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचे आभार मानले. पुढे बोलताना ते म्हणाले की, दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो म्हणून आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोटयावधी युवक बेरोजगार झाले आहेत. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरातील युवकांच्या रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी सूरज शिरकुल, दीपक वरगंटी, दीपक मठ, राजू हुंडेक़री, हनमंतु रूपनर, श्रीनिवास कोटा, प्रशांत शिरकुल, गोविंद शिरकुल, दीपक शिवराळ, गुरु वरगंटी, आदि उपस्थित होते.



















