सोलापूर : संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी सोलापूर शहरात आगमन झाले. रुपाभवानी चौक याठिकाणी महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनी पालखीचे प्रशासना तर्फे स्वागत केले, याचबरोबर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनीही पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनीही महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, काँग्रेस नेते अशोक निंबार्गी शहराध्यक्ष चेतन नरोटे विनोद भोसले माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, तिरुपती परकीपंडला यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे आणि महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी फुगडी खेळून सर्वांचा उत्साह वाढवला..
पालखीच्या स्वागतानंतर माध्यमांशी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. राज्यात भरपूर पाऊस पाड असे साकडे घातले असून बळीराजाला सुखी कर असे सांगतानाच राज्यांमध्ये स्थिर सरकार येऊ दे असेही श्री गजानन चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले.


















