भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोलापूर लोकसभा प्रवास दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर बैठक आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
याप्रसंगी आमदार देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी व वातावरण निर्मिती करण्यासाठी युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने उतरण्याची गरज असून,युवा मोर्चाने आपल्या कार्यकुशलतेने आपली वेगळी चुणूक या दौऱ्यात दाखवावी असे प्रतिपादन मनोगत व्यक्त करताना केले.
प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी या दौऱ्यात कशा पद्धतीने सहभागी व्हावे याची माहिती दिली.
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी केले व प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी बैठकीत आभार मानले.
याप्रसंगी प्रदेश सचिव गणेश साखरे, संदीप टेळे, प्रदीप पाटील, सर्जेराव पाटील, दयानंद बेंबळगी, प्रभाकर बिराजदार, विशाल जाधव व भाजयुमो जिल्हा व तालुका प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते*