सोलापूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी व आमदार प्रणिती शिंदे यांच्या ९ डिसेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरसह ग्रामीण भागात दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्या सहकार्याने युवक अध्यक्ष, संयोजक गणेश डोंगरे यांनी भरगच्च असे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमाला शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचीही साथ लाभत आहे.
जुळे सोलापूर भागातील भंडारी क्रीडांगणावर प्रथमच तब्बल 51 हजाराचे पारितोषिक असलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या उपस्थित झाले. यावेळी चेतन नरोटे, शिवा बाटलीवाला, भारत जाधव, ॲड.केशव इंगळे, अनुराधा काटकर, माजी महापौर अलका राठोड, महिला अध्यक्ष बेंजरपे, अंनत म्हेत्रे अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि सत्कार स्वीकारून त्या नागपूर अधिवेशनासाठी रवाना झाल्या.
शहरासह जुळे सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे, तेलगाव, पाकणी, शिवणी भागात भारत जाधव यांच्या सहकार्यातून कार्यक्रम घेण्यात आले आहेत. सात रस्ता परिसरात दर्शनी भागात आमदार प्रणितीताईंचे 40 फुटी डिजिटल फलक लावण्यात आले आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सोलापूर युवक काँग्रेस वतीने शहरांमधील प्रभागामध्ये विविध ठिकाणी कला, क्रीडा, सामाजिक कार्यक्रम घेण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा, प्रो कबड्डी स्पर्धा, महाआरोग्य शिबीर, रक्तदानशिबिर, युथ आयकॉन पुरस्कार, MPSC,UPSC अभ्यास केंद्र साहित्य वाटप, 9 डिसेंबर रोजी जन्मणाऱ्या मुलींना किट वाटप, महिला महाविद्यालय मध्ये व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, शासनाचे विविध मोफत दाखले शिबिर, महिलांना साड्या वाटप, गोरगरिबांना चादर वाटप, अनाथाश्रमात विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा व अन्नदान, आपुलकी बेघर निवारण केंद्र येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा विविध कार्यक्रमांचे संपूर्ण डिसेंबर महिनाभरात आयोजन करण्यात आले आहे.