सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी सोलापूर दौर्यावर आले आहेत सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे विमानतळावर आगमन झाले यावेळी सोलापूर शहर प्रमुख तथा नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, उपशहरप्रमुख भागवत जोगदनकर यांनी नामदार सामंत यांचे स्वागत केले यावेळी त्यांना शहरप्रमुख धुत्तरगावकर यांनी निवेदन दिले या निवेदनात राज्यातील प्राध्यापक ती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे, 4 मे 2020 च्या शासन निर्णयात प्राध्यापक भरतीस वगळावे आणि रखडलेली भरती प्रक्रिया मार्गी लावावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे