दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील जिव्हाळा दीपक ताम्हणकर वसतिगृहातील तब्बल 46 मतिमंद विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे, ही माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या स्टाफ सह अंत्रोळी गेले त्याठिकाणी पाहणी केली, त्या जिव्हाळा वसतिगृहात 76 विद्यार्थी आहेत त्यापैकी 46 विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाले, 44 विद्यार्थी हे rtpcr टेस्ट तर 2 विद्यार्थी हे रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह निघालेत, सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहातच आयसोलेट करण्यात आले आहेत, तर एकाला लक्षणे असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, इतर सर्व तेथील कर्मचाऱ्यांना सुध्दा वसतिगृहात कोरोन्टाईन करण्यात आले आहे, जिव्हाळा वसतिगृह हे अंत्रोली गावापासून दूर अंतरावर आहे, त्यामुळे गावाला कोणताही धोका नाही , दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जाधव यांच्याशी चर्चा केली असता आरोग्य यंत्रणा या घटनेमुळे सतर्क झाली आहे, आम्ही सर्व काळजी घेतली असून विद्यार्थ्यांना वसतिगृहात आयसोलेट केले आहे, आठ कर्मचारी असून त्यांनाही कोरोन्टाईन करण्यात आले असून पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले आहेत, या प्रकरणात
शाळेतील एक कर्मचारी पॉझिटिव्ह झाला होता, त्याच्यामुळेच ही लागण झाल्याशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने प्रशासन सतर्क झाले असून अचानक एकाच ठिकाणचे तब्बल शेचाळीस जण पॉझिटिव्ह निघाल्याने सोलापूर जिल्ह्यातच काय संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे सर्व शाळा कॉलेज वसतिगृह बंद असताना या जिव्हाळा वसतिगृहात तब्बल 76 जण इतके दिवस कसे काय ठेवले हे अजून समजू शकले नाही यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अपंग कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणे महत्त्वाचे आहे.