सोलापूर / प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे दिलपाक प्रतिष्ठान संचालित नालंदा विहारात कर्मयोगी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष खंडू रोकडे यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे ही पूजन करण्यात आले.
यावेळी स्वप्नील तात्यासाहेब पारधे या विद्यार्थ्याने गुरु रोहिदास यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले. उपस्थितांनीही त्याच्या भाषणाचे कौतुक केले.
समाजाची नि:स्वार्थपणे सेवा करणारे तसेच जाती-पातीच्या भिंती तोडण्यासाठी तसेच अंधश्रद्धा-रूढी परंपरा यांच्यावर सतत प्रहार करणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी युवराज रोकडे, नागनाथ रोकडे, भगत रोकडे, राम रोकडे, गणेश रोकडे, किशोर रोकडे, बाबासाहेब रोकडे, प्रशांत रोकडे, शिवाजी पारधे, तात्यासाहेब पारधे, दिलपाक प्रतिष्ठानचे सदस्य बाबासाहेब दिलपाक, ज्ञानेश्वर दिलपाक, गौतम दिलपाक, संतोष दिलपाक, मनोज दिलपाक, बालाजी दिलपाक, संकेत दिलपाक, हर्ष दिलपाक आदी मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















