भारतीय जनता पार्टीचे शहर उत्तरचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे शनिवारी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक असल्याने ते 4 मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून सोलापूरला आले होते, तेव्हा पासून ते शहरात तळ ठोकून होते, शहरातील भारतीय जनता पार्टी साठी स्थायी समिती सभापतीची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने त्यांनी जोर लावला होता चार ते पाच मार्च दरम्यान त्यांनी महापौर नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या अनेक बैठका घेतल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या संपर्कात दोन दिवसात अनेक राजकीय कार्यकर्ते आले आहेत त्यांना लागण सोलापुरातून झाली की मुंबईला अधिवेशनला गेल्यानंतर झाली हे मात्र समजू शकले नाही. सोलापुरातील लोकप्रतिनिधी पैकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे , उज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे आमदार सुभाष देशमुख आमदार भारत नाना भालके सिद्धाराम म्हेत्रे, महापौर श्रीकांचना यंनम, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले काँग्रेस नगरसेवक रियाज हुंडेकरी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आमदार प्रशांत परिचारक, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह अनेक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य हे कोरूना पॉझिटिव्ह झाले होते त्यानंतर आता दुसऱ्या लाटेत आमदार विजयकुमार देशमुख यांचा नंबर लागला आहे.


















