ऑगस्ट 2020 मध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी भरती वैंशपायन मेडिकल कॉलेजने काढली त्यामध्ये एक्स-रे टेक्निशियन लॅब टेक्निशियन ईसीजी टेक्निशियन स्टाफ नर्स वॉर्डबॉय अशा जागा भरण्यात आल्या जागा भरताना तीन महिन्याचा करार या कर्मचाऱ्यांसोबत झाला होता दरम्यान त्यांचे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे तीन महिने संपले पुन्हा त्यांचा करार वाढून देणार असं सांगून कामावर रुजू करण्यात आलं , ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने पगारही दिला गेला नाही आणि अचानक 5 जानेवारी 2021 रोजी या 124 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले, आता जानेवारी फेब्रुवारी हे दोन्ही महिने संपले मार्च महिना सुरू आहे अजूनही या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नाही जिल्हाधिकाऱ्यांकडून ही भरती असल्याने त्यांनी या कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान आतून करावेत असे आदेश दिले आहेत मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे करुणा पॉझिटिव्ह झाल्याने ते 22 फेब्रुवारी पासून कामावर नाहीत आता त्यांच्या सही वाचून या कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका मांडताना कोरोना संसर्ग अजूनही कमी झालेला नाही कोव्हीडचे पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत असे असताना आम्हाला पुन्हा कामावर घ्यावेत अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.


















