सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी वरदराज बंग यांची तर उपाध्यक्षपदी सी.ए.सुहास श्रीगोंदेकर यांची निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या बँकेच्या संचालकपदासाठीच्या पंचवार्षिक निवडणूकीत परिवार पॅनलचे सर्व १७ उमेदवार निवडून आले. त्यानंतर रविवारी संचालक मंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी बँकेचे मावळते अध्यक्ष किशोर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. तसेच परिवार पॅनलचे पॅनल प्रमुख आणि बँकेचे मावळते अध्यक्ष किशोर देशपांडे यांचाही सत्कार झाला. निवडीनंतर श्री. देशपांडे यांनी उपस्थित संचालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक प्राचार्य गजानन धरणे, ऍड. प्रदीपसिंह राजपूत, पुरुषोत्तम उडता, चंद्रिका चौहान, जगदीश भुतडा, सुनिल पेंडसे, सी.ए. गिरीश बोरगांवकर, आनंद कुलकर्णी, राजेश पवार, मुकुंद कुलकर्णी, डॉ. किरण पाठक, विनोद कुचेरीया (लातूर), ऍड. मिलिंद कुलकर्णी (माळशिरस), रवींद्र साळे (पंढरपूर), दत्तात्रय कुलकर्णी (उस्मानाबाद) बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वाईकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, निलेश भंडारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, निलेश भंडारी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना आणि संचालकांना शुभेच्छा दिल्या.



















