सोलापूरातील ज्येष्ठ अभ्यासू इन सोलापूर चॅनलचे पत्रकार सुरेश बहिरवाडे यांचे निधन झाले, नवी पेठेत त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते,
बहिरवाडे यांचा सोलापूरात इन सोलापूर चॅनलच्या उभारणीत मोठा वाटा होता, ते पत्रकारिता क्षेत्रात ऑल राउंडर होते जिल्हा न्यायालयात त्यांची विशेष ओळख होती , सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा त्यांच्या शिवाय पूर्ण होत नव्हती, सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्यात आपल्या आवाजात यात्रेचं संकलन करत असत. प्रचंड असा अभ्यास बहिरवाडे यांचा श्री सिद्धरामेश्वर यांच्यावर त्यांचा होता पत्रकारितेच्या क्षेत्रात आलेल्या नव्या पत्रकारांना ते कायम मार्गदर्शन करत असत.


















