Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गुड न्यूज ! काँग्रेसच्या या नगरसेविकेने कोरोना रुग्णासाठी हा राबवला उपक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 April 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे.रुग्णांना उपचार मिळणे अवघड बनले आहे.शिवाय बेड आणि ऑक्सिजन अभावी अनेकांचे बळी जात आहेत.गोरगरिबांना उपचारासाठी अक्षरशः वणवण भटकंती करावी लागत आहे.सोलापूरात रुग्णांची अवस्था बघून प्रभाग क्रमांक १६ च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल प्रभागातील गरजू रुग्णांसाठी धावून आल्या आहेत.प्रभाग कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी गुरूनानक चौक परिसरातील ऑफिसर्स क्लबसमोर असलेल्या संस्मरण उद्यानाच्या बाहेरील मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला चक्क कंटेनर कोविड सेंटर उभारले आहे.हे कंटेनर साधेसुधे नसून संपूर्ण वातानुकूलित असून याठिकाणी २४ तास डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे.आठ बेडचे ऑक्सिजनयुक्त हे कंटेनर कोविड सेंटर सोमवारपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिली.

 नगरसेवक फंडातून सुमारे १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या कंटेनर कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना ऑक्सीजन बरोबरच औषधगोळ्यासुद्धा मोफत देण्यात येणार आहेत.कोरोनाच्या कालावधीत ऑक्सिजन बेड न मिळाल्याने कोणाचा जीव जाणार नाही या उद्देशाने हे वातानुकूलित कंटेनर कोविड सेंटर उभारण्यात आल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.अमरदीप कंस्ट्रक्शनचे सलीम शेख यांनी अत्यंत कमी कालावधीत या कंटेनर हॉस्पिटलची निर्मिती केली आहे.

    प्रभाग क्रमांक १६ हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे .दाटीवाटीने असलेली घरे आणि अन्य कारणांमुळे नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्यामुळे आणि त्यावेळी  त्यांना अन्य मोठ्या रुग्णालयात उपचाराअभावी त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून तातडीने त्या नागरिकाला उपचार मिळावेत म्हणून     ऑक्सिजनयुक्त कंटेनर कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे

– कोरोनामुक्त प्रभागासाठी उचलले पाऊल  – 

सोलापूर शहरात कोरोना रुग्ण आणि त्याचबरोबर मृतांचा वाढता आकडा चिंताजनक बनला आहे. ऑक्सीजनबेड शिल्लक नसल्यामुळे अनेक जण दगावत आहेत तर बहुतांश हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांना उपचार मिळणे अवघड बनले आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रभागातील नागरिकांच्या मदतीला धावून येणे आपण आपले कर्तव्य समजतो .आणि याच कर्तव्य भावनेतून प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी तसेच संपूर्ण प्रभाग कोरोनामुक्त करण्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्चून वातानुकूलित कंटेनर कोविडड सेंटर उभारण्यात आले आहे. याशिवाय स्वखर्चातून डॉक्टर मंडळींची सुद्धा मदत घेण्यात आली आहे तसेच मोफत औषधगोळ्यासुद्धा रुग्णांना देण्यात येणार आहेत. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना या ठिकाणी ऑक्सिजन बेडच्या माध्यमातून उपचार करूनच त्याला घरी पाठविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.

ऑक्सीजन बेडसह गरम पाण्यासाठी गिझर – 

प्रभाग क्रमांक १६ च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सुरू केलेल्या दोन वातानुकूलित कंटेनर कोविड सेंटरमध्ये एकूण आठ बेड आहेत. ज्यामध्ये चार बेड ऑक्सीजनयुक्त तर ४ बेड अन्य रुग्णांवर उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत. एका कंटेनरमध्ये ओपीडीसह चार बेड तर दुसऱ्या कंटेनरमध्ये ऑक्सीजन बेड तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी येणारे एम.डी.मेडिसिन डॉक्टर तसेच नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वातानुकूलित रूम तयार करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णांना संडास आणि बाथरूमची व्यवस्था असून गरम पाण्यासाठी गिझरचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. मुबलक पाण्याची व्यवस्था सुद्धा टाक्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दोन्ही कंटेनरमध्ये २४ तास चालेल अशी वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच पंखेसुद्धा बसविण्यात आले आहेत. स्वच्छ प्रकाश यावा म्हणून एलईडी लाइट्स लावण्यात आले आहेत. तर ऑक्सिजनचे सिलेंडर ठेवण्यासाठी कंटेनरच्या बाहेर सुरक्षित अशा प्रकारचा बॉक्स तयार करण्यात आला आहे.कंटेनरच्या बाहेरील संपूर्ण परिसर स्वच्छ राहण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बाकडे टाकून विविध प्रकारच्या झाडांनी परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.👆👆👆👆👆

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी ! राज्यात 15 मे पर्यंत संचारबंदी वाढवली

Next Post

ब्रेकिंग ! उजनीची सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईन 10 महिन्यात पूर्ण करणार, 200 बेड हॉस्पिटल युद्धपातळीवर होईल, महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांचा संकल्प

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! उजनीची सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईन 10 महिन्यात पूर्ण करणार, 200 बेड हॉस्पिटल युद्धपातळीवर होईल, महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांचा संकल्प

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002502
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group