सोलापूर : बाळे येथील एन के किड्स स्कूलचे संचालक विकास कस्तुरे यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब लोकांना अन्नदान करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प आहेत. परिणामी गोरगरीब ,वंचित यांना रोजी रोटीचा प्रश्न भेडसावत आहे. त्यांना चार घास अन्न द्यावे या उदात्त हेतूने कस्तुरे परिवाराने विश्व याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व वंचित घटकांना अन्नदान केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे , योगेश कल्याणकर, विश्व कस्तुरे उपस्थित होते.
गोरगरिबांना करा अन्नदान : श्वेता कस्तुरे
लॉकडाऊन मुळे गोरगरीब ,वंचित यांना रोजी रोटीचा प्रश्न भेडसावत आहे. भुकेलेल्याना अन्नदान करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच हीच आपली संस्कृती आहे. तेव्हा वाढदिवस आणि नातेवाईकांच्या जयंती , पुण्यतिथी निमित्त गरजू लोकांना अन्नदान करावे असे आवाहन मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे यांनी केले आहे.
















