सध्याच्या घडीला कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे.हजारो संख्यांनी लोक मरत आहेत.त्यात गरीब लोकांना अन्न भेटत नाही, म्हणून ते मरत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूरचा युवा चित्रकार विपुल मिरजकर याने त्याने बनवलेल्या सर्व पेंटिंग विकण्याचा निर्णय घेतलाय, पेंटिंग विक्रीतून आलेला 80 टक्के पैसा तो गरिबांच्या मदतीला देणार आहे, ज्यांना अन्न लागेल, हॉस्पिटलसाठी आर्थिक मदत लागेल अशा ठिकाणी तो मदत करणार आहे, कृपया माझ्या पेंटिंग घेऊन घेऊन गरिबांना मदत करा.. असे आवाहन विपुल मिरजकर याने केले आहे. 80559 28066 हा त्याचा मोबाईल नंबर आहे.


























