Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माझे काम मंत्रीपदाच्या ‘लेव्हल’चेच ; आमदार प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी काँग्रेस भवनात एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी “प्राण जाये पण पाणी न जाये” अशी भूमिका मांडतानाच नकळत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याला विरोध दर्शवला.

शहरातील पाणीपुरवठयावरूनही ही त्यांनी महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपला टार्गेट केले, समांतर जलवाहिनीसाठी 50 कोटीचा तरतूद होती मात्र आता ती 130 कोटी वर गेल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला जातोय शहराला वेठीस धरले जातंय असा आरोप त्यांनी महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांवर केला.

पालकमंत्री भरणे यांच्यावर सोलापुरातून संताप व्यक्त होत असतानाच त्यांना बदलण्याची मागणी पुढे आली विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा अशी मागणी केली होती त्यावर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री पदाचा विषय काढला असता मी राजकारणात मंत्रीपद घेण्यासाठी आले नाही माझ्या मतदारसंघातील जनतेची कामे हीच माझी भूमिका राहिली आहे सध्या मी जे काम करते ते मंत्रिपदाचा लेव्हलचे आहे, त्यामुळे मंत्रीपद मला गरजेचे वाटत नाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मला पालकमंत्री करावं ही जी भूमिका मांडली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे असेही त्या मिश्कीलपणे म्हणाल्या.

राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी सुमारे पाचशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे या सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्यात येणार आहे हे पाणी बॅक वॉटर असेल की सांडपाण्यावर प्रक्रिया करून असेल ते मिळणार असल्याचं इंदापूर चे राष्ट्रवादीचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा सांगत आहेत पाच टीएमसी पाणी इंदापूरला जाणार हे समजल्यानंतर सोलापूरच्या अनेक नेत्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली, अनेकांना राजकीय विरोध करण्यासाठी विषय मिळाला, असे अनेक जण भरणेमामा वर तोंडसुख घेत आहेत.

पालकमंत्री भरणे मामा ओरडून सांगत आहेत सोलापूरला असलेल्या नियोजित पाण्याला हात न लावता उजनीतून पाणी घेतले जाईल खरे तर या प्रकरणात उजनी धरण हे कधी शंभर टक्के भरते तर कधी 120 टक्के.  मात्र धरणाचे नियोजन हे शंभर टक्के पाण्यावर झालेले असते तसे पाहिले तर इंदापूर तालुक्याचा बराच भाग या धरणाला जोडून आहे मात्र सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी किती टीएमसीचे नियोजन आहे, एनटीपीसी प्रकल्पासाठी उजनी धरणातून पाईपलाईन आणली आहे त्यांना किती टीएमसी दिले जाणार आहे, भीमा नदीवर विविध मोठ्या गावच्या पाणीपुरवठा योजना आहेत त्यांच्यासाठी किती पाणीसाठा नियोजित आहे, सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रासाठी किती पाण्याचे नियोजन आहे, सीना नदी मध्ये किती पाणी वर्षाला सोडले जाते, विविध कालवा तसेच विविध उपसा सिंचन योजना, सीना माढा योजना यांना वर्षाला किती पाणी नियोजित ठेवण्यात आले आहे ,याची माहिती मात्र कुणीही देत नाही ऊठसूट पालकमंत्री भरणे यांच्यावर तोंडसुख घेत आहेत सोलापूर शहराला उजनी वरून थेट जलवाहिनी आहे, औज  बंधाऱ्यातून शहराच्या भागाला पाणी पुरवठा होतो तसेच हिपरगा तलावातून शहराचा काही भाग पाणी पितो मात्र या जलवाहिनी मध्ये अनेक गळत्या आहेत उजनी वरूनच दुसरी समांतर जलवाहिनी शहरासाठी टाकण्यात येत आहे मात्र  त्याचे काम रखडल्याने निधी वाढत चालला आहे 2014 नंतर भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात होते त्यांनी या समांतर जलवाहिनी साठी किती प्रयत्न केला किती निधी दिला हासुद्धा मोठा विषय आहे. भीमा नदीत पाणी सोडले तर ते पहिल्या पन्नास किलोमीटरवर पाण्याचा प्रवाह मोठा असतो नंतर हे पाणी कमी होत जाते तसे पाहिले तर टेल टू हेड असा नियम असताना पाणी मोहोळ तालुक्याचा पुढे जातच नाही, सिनेत पाणी सोडल्यानंतर ते तिऱ्हे गावाच्या पुढे जातच नाही, औज बंधारा हा कर्नाटकला लागून असल्याने त्या बंधाऱ्यातील 60 टक्के पाणी हे कर्नाटकचे शेतकरी उचलतात त्यामुळेही शहराला पाणी प्रश्न भेडसावतो तो जर बंधारा वडापूर जवळ केला तर पाण्याचे योग्य नियोजन होईल.

SendShareTweetSend
Previous Post

आपल्या पेंटिंग विकून 80 टक्के रक्कम देणार गरिबांना ; युवा चित्रकाराचे आवाहन

Next Post

गुड न्यूज : महापालिकेने तयार केले 90 ऑक्सिजन बेड चे हॉस्पिटल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गुड न्यूज : महापालिकेने तयार केले 90 ऑक्सिजन बेड चे हॉस्पिटल

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002502
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group