सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे त्याअनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने काडादी मंगल कार्यालय येथे 140 बेडचे डीसीएचसी हॉस्पिटल सेंटर सुरू करण्यात आले. याठिकाणी 90 बेड ऑक्सिजन साठी उपलब्ध करण्यात आले असून त्यापैकी सध्या 40 बेडला ऑक्सिजन सुरू आहेत. प्रभागातील ज्यांचे ऑक्सीजन लेव्हल 85 ते 95 पर्यत,सौम्य लक्षणे,मध्यम लक्षणे असलेल्या अशा कोविड पेशंटला उपचारासाठी पाठवण्यात यावे.शहरातील नागरिकांनी घरा बाहेर पडू नये ,मास्कचा वापर करावा,सोशल डिस्टन्स ठेवावा असे आवाहन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केलयं.


















