प्रति,
मा.प्रणिती शिंदे,
आमदार, सोलापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात व गावात लॉकडाऊन काळात कुटुंबीय आप्तजनांना दुचाकीवरून डबलशीट नेण्यास बंदी नसताना तसेच राज्य सरकार व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख जिल्हाधिकारी यांच्या आदेशात कुठेही उल्लेख नसताना फक्त आणि फक्त सोलापूर शहरात डबलशीट बंदी हा जुल्मी कायदा का लागू आहे यांचा खुलासा होत नाही. आयुक्त सोमपा यांचे ७ मे च्या सूधारीत आदेशात दुचाकीवर केवळ एक व्यक्ति यांचा कुठेही उल्लेख नसताना आजरोजी पर्यंत सोलापूर शहरात पोलीसांकडून नागरीक आपले कुटुंबीय पत्नी, मुले, आईवडील, भाऊबहीण यासह दवाखाना, जिवनावश्यक खाद्य आणणेस जात असताना डबलशीट दुचाकींवर कारवाई चालू असून वाहने जप्त व दंडात्मक अन्यायकारक कारवाई चालू आहे. कृपया याबाबत आपण हस्तक्षेप करून ही कारवाई त्वरीत थांबवण्याची प्रशासकीय कार्यवाही करावी ही हात जोडून विनंती.
अॅड. मनीश गडदे,
सरचिटणीस सोलापूर कॉंग्रेस कमिटी.



















