कोरोना लॉकडाऊन असेल की संचारबंदी, सर्वात फ्रंट लाईनला असलेला शासकीय कर्मचारी म्हणजे पोलीस. गर्दी पांगवणे, कायदा सुव्यवस्था ठेवणे ही मोठी जबाबदारी पोलीस प्रशासन निभावते, त्यांच्या कार्याला कायमच सॅल्युट आहे.परंतु असे काही या यंत्रणेत कर्मचारी आहेत जे की या पेशाला बदनाम करतात, काळिमा फासतात, त्यामुळे त्यांच्यावर सर्वसामान्यांतून नाराजी व्यक्त होते.
सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सोलापूर शहरात येणाऱ्या एन्ट्री पॉईंटला नाकाबंदी लावण्यात आली आहे, मंगळवेढा रोडवर देगाव जवळ असलेल्या टोलनाक्या नजीक पोलिसांचा एन्ट्री पॉईंट आहे, तिथे जाणीवपूर्वक नागरिकांना त्रास दिला जातोय अशा अनेकांकडून तक्रारी आल्या आहेत, जिल्ह्यात कामानिमित्त ये जा करणाऱ्यांना इ पासची गरज नाही, परजिल्ह्यात जाण्यासाठी पास लागतो मात्र, हॉस्पिटलला, शासकीय कामानिमित्त येणाऱ्यांना देगाव जवळ पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात आहे,
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर या गावचे ग्रामसेवक मधुकर गुलाब पवार यांना आपली जबाबदारी पार पाडताना कोरोनाची लागण झाली, त्यात त्यांचे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह झाले, लक्षणे नसल्याने ते होम कोरोन्टाईन होते, मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे म्हणून त्यांनी सोलापूरातील फुप्फुस तज्ञ डॉ शार्दूल कुलकर्णी यांची वेळ घेऊन ते औषध गोळ्या घेण्यासाठी सोलापूरला मंगळवेढ्याहून खाजगी कारमध्ये दिनांक 12 मे रोजी आले होते, परत मंगळवेढ्याला जाताना त्यांना पोलिसांनी एन्ट्री पॉईंटला अडवले तेव्हा पवार यांनी मी ग्रामसेवक आहे कोरोना पॉझिटिव्ह असून सोलापूर शहरात डॉक्टरकडे तपासून औषधे घेण्यासाठी आलो आहे असे सांगितले. ओळखपत्र दाखवले, डॉक्टरने औषधे लिहून दिलेली प्रिस्क्रिप्शन दाखवली औषधे दाखवले तरीही पोलिसांनी e pass ची विचारणा केली जिल्ह्यामध्ये फिरण्यास पासची गरज नाही असे सांगितले असता पोलिसांनी जाणीवपूर्वक त्रास देण्यास सुरू केला शेवटी तोंडावर मास्क नाही असे म्हणून पाचशे रुपये दंड केला, आम्हीसुद्धा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करतो एवढं करूनही पोलिसांकडून की वागणूक योग्य नाही, याप्रकरणी ग्रामसेवक पवार यांनी पोलिसांच्या या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याच इंट्री पॉइंटला पोलिसांकडून शहरात येणाऱ्या नागरिकांना वारंवार त्रास दिला जात असल्याची तक्रार बाजार समितीचे माजी संचालक श्रीमंत बंडगर यांनी ही बोलून दाखवली आहे.






















