सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर व आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांच्या कोरोनाची काळजी घेण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात येत आहे. सोलापूर शहरातील सर्व बाल रोग तज्ञ यांची एकत्रित बैठक महापालिकेत घेण्यात आली. या बैठकीस महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे ,अध्यक्ष बालरोग तज्ञ संघटना डॉ. शिरशेट्टी बाल रोग तज्ञ सचिवा सरिता आरकाल डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. संदीप कुलकर्णी, डॉ.नकाते, डॉ. हेमंत साठे, डॉ. किरण पाटील, डॉ.समीर खान, डॉ. विक्रम हिरेकेदर, डॉ.प्रतिभा पाटील, डॉ. चाफळकर आदी उपस्थित होते.
सोलापूर महानगरपालिका वतीने आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. लहान मुलांचे पिव्हर ओपीडी हे सर्व 15 नागरिक आरोग्य केंद्र येथे सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने डॉक्टरांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी फिव्हर ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. ज्यांना कोविडचे सौम्य लक्षणे,माध्यम लक्षणे असलेल्या मुलांची तपासणी कुठे करण्यात येईल याबद्दल महापालिकेच्या वतीने यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
शहरातील लहान मुलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून आयसुलेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये वाडिया हॉस्पिटल येथे 50 बेड तसेच डफरीन हॉस्पिटल येथे 20 बेड तयार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या या दोन्ही लाटेमध्ये लहान मुलांमध्ये जास्त प्रभाव जाणवला नाही. त्यात सोलापूर शहरात आत्तापर्यंत मृत्यु प्रमाण हे कमी आहे. शहरात तीन मुलांचा मृत्यू आत्तापर्यंत झालेल्या आहेत. सर्व नागरिकांना आवाहन आहे की महापालिका प्रशासन, खाजगी हॉस्पिटल हे कोरोनाचा निदान करण्यासाठी तयार आहेत. तरी नागरिकांनी विनंती आहे की आपल्या मुलांना कोरोनाचे लक्षणे दिसल्यास त्वरित महापालिकेच्या फिव्हर ओपीडी येथे घेऊन यावे. जेणेकरून त्यांची तपासणी करून पुढील उपचार देण्यासाठी सोय करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या मुलांना वारंवार हात धुण्यास ,मास्क लावण्यास तसेच सोशल सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगावे.असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले.

















