दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातील कलाकारांनी एकत्र येऊन ऑक्सीजन ही शॉर्टफिल्म तयार केली होती, प्रदीप हनुमंत माने यांनी त्याचे दिग्दर्शन केले ,विशाल जगदाळे व ओंकार पाटील हे या चित्रपटाचे प्रोडूसर आहेत तसेच ज्ञानेश्वर शिंदे प्रसाद डांगे, साहेबा मोरे ,अक्षय मुतेलु यांनी या चित्रपटात भूमिका केली आहे ,नमन जाधव अजय घाटे यांचाही या शॉर्ट फिल्ममध्ये महत्त्वाचा रोल राहिला आहे.पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा पुणे 2021 मध्ये OxyGen या शॉर्ट फिल्मची देश-विदेशातील फिल्म्स मधून निवड (OFFICIAL SELECTION) करण्यात आली आहे.
शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक प्रदीप माने म्हणाले, कोरोना संसारामध्ये ऑक्सिजनची गरज काय आहे याचा प्रत्यय सर्वांनाच आला, माझ्या एका मित्राची आई ऑक्सिजन न मिळाल्याने मरण पावली, त्यामुळे वृक्षसंवर्धन किती महत्वाचे आहे हे मी या फिल्म मधून दाखवून दिले आहे. खरे आमच्या फिल्म मधील मेन रोल केलेला ज्ञानेश्वर शिंदे हा कर्णबधिर आहे, तरीही त्याने उत्तम प्रकारे यात भूमिका केली आहे. या फिल्म ला ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचा मी आभारी आहे.



















