Monday, June 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

करण म्हेत्रे अंत्यविधी प्रकरणावरून आ. प्रणिती शिंदे आक्रमक ; सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना केले लक्ष, राजकीय दबावापोटी गरीब जनतेवर अन्याय करताय का ?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  15 मे 2021 रोजी लष्कर विभागातील सामाजिक कार्यकर्ते स्व. करण म्हेत्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा दि. 16 मे 2021 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान निघाली होती. स्व. करण म्हेत्रे यांच्या प्रेमापोटी या अंत्ययात्रेत मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. यादरम्यान पोलीसांनी नागरीकांना अंत्ययात्रेत जाण्यास रोखल्यामुळे नागरीक व पोलीस प्रशासनामध्ये किरकोळ वादावाद झाला. या अंत्ययात्रेतील फोटा व व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. त्या दिवशी संध्याकाळी सुमारे 8 च्या दरम्यान पोलीस प्रशासनांनी या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरीकांविरोधात सुमारे 200 ते 250 जणांवर कलम 353, 188 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्रत्येक्षात 8 ते 10 नागरीकांसोबत वादावाद झाला असला तरी 200 ते 250 जणांवर सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंदविणे हे अन्याय कारक आहे, त्याबददल आमदार प्रणिती शिंदे व मोची समाजातील शिष्टमंडळ यांनी सोलापूरचे पोलीस आयुक्त यांची भेट घेवून सर्व परिस्थितीची माहिती दिली. तसेच ज्या 8 ते 10 नागरीकांनी पोलीसांशी वादावाद केला होता त्या नागरीकांची नावे पोलीस प्रशासनाला देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाने दिले. परंतू निरपराध नागरीकांवर नोंद केलेला कलम 353 (सरकारी कामात अडथळा आणणे) गुन्हा हा रद्द करून कलम 188 अंतर्गत कारवाई करावी अशी विनंती केली. त्यावेळेस पोलीस आयुक्तांनी शहानिशा करून जे खरोखरच दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून निरपराध नागरीकांवरील गुन्हे रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.

परंतू त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी संपूर्ण लष्कर परिसर, बेडरपूल, लोधी गल्ली येथील रस्ते संपूर्णपणे बंद करून नागरीकांच्या घरामध्ये घुसून दिसेल त्या युवकांना कोरोना टेस्ट करण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये बसवून त्यांच्यावर अन्यायकारक रितीने अटकेची कारवाई केली. त्यामध्ये 50 जणांना अटक केली. त्यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने सर्व 50 जणांना जामीन मंजूर केला. तसेच या संपूर्ण परिसरातील रहदारीचे रस्ते बंद करून नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार केले. तसेच या परिसरातील नागरीकांना भाजीपाला व जिवनाश्यक वस्तूंची खरेदी, दवाखान्यातील उपचार, एखादी अपघाती घटना घडल्यास येण्या-जाण्यासाठीचा रस्ता सोडला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरीकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून गोर-गरीब नागरीकांवरील अन्यायकारक कारवाई थांबविण्याची मागणी केली. तसेच माजी गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना फोन करून पोलीस आयुक्त करीत असलेल्या अन्यायकारक कारवाईबददल माहिती देवून ती कारवाई तात्काळ स्थगित करण्याबद्रदल आदेश देण्याची मागणी केली. परंतू पोलीस आयुक्तांनी हि अन्यायकारक कारवाई सुरुच ठेवून मोदी, मौलाली चौक, लष्कर या भागातील विशिष्ट समाजातील युवकांना हेतूपूर्वक अटक केली. हा समाज कष्टकरी व गरीब असून या समाजातील बहुतांश लोक हातावर पोट असलेले आहेत. तसेच या गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलेल्या निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. याबद्दल लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंतीचा अवमान करत अंत्यविधीला सामिल होणारे नागरीक जसे काही आतंकवादी असल्याप्रमाणे त्यांच्यावर घरात घूसून अटकेची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त हि जी कारवाई करीत आहेत ती वैयक्तिक आकसापोटी किंवा कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी करीत आहेत असा संशय निर्माण होत असल्याचे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त करून सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा निषेध केला आहे. तसेच हि जर कारवाई स्थगित केली नाही तर मा. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

योगायोग : दोन ‘स्वामीं’चा जुळला योग ; आता सोलापूर कोरोनामुक्त होईल ; तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह रहा, कोरोना निगेटिव्ह होईल ; स्वामी रामदेव यांनी साधला सोलापूरकरांशी संवाद

Next Post

पालकमंत्री भरणेमामा प्रेसमधून का ? उठले पहा ; आ. प्रणिती शिंदे व इंदापूरच्या पाण्याचा विषय येताच तोंड पडले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पालकमंत्री भरणेमामा प्रेसमधून का ? उठले पहा ; आ. प्रणिती शिंदे व इंदापूरच्या पाण्याचा विषय येताच तोंड पडले

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1983180
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group