पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी करोना स्थितीचा आढावा घेतला यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली दरम्यान सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते करण मेहेत्रे यांच्या अंत्यविधीला उसळलेली गर्दी आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने केलेला कंटेनमेंट झोन यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना लक्ष् केले आहे,राजकीय दबावाखाली पोलिस प्रशासन नागरिकांवर कारवाई करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे, त्याचबरोबर इंदापूरच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे यावर इंदापूरच्या नागरिकांना काय आवाहन कराल असा प्रश्न विचारताच भरणे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपावर बोलणे टाळत थेट पत्रकार परिषदेतून ते उठले आणि इंदापूरच्या पाणीप्रश्नावर त्यांचे तोंड पडलेले दिसून आले, पालकमंत्र्यांचा हावभाव काय होता पाहा व्हिडिओ

















