राज्यासह जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला तर एक जुन लाॅकडाऊन काढण्याचा विचार मंत्रीमंडळाकडून केला जात असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून राज्यात आणि जिल्ह्यात करुणा चा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे, याच दरम्यान लसीकरण मोहीम हि सर्व स्तरापर्यंत करून घेतले जात आहे याशिवाय तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्याकरताचे प्रयत्न केले जात आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून पुढील काळामध्ये राज्यात आणि जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला तर एक जून नंतर राज्यात आणि जिल्ह्यात लाॅकडाऊन शिथील करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला जात असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली हा व्हिडीओ पहा

















