स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर विभागाचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 58 होते .शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला कोरोनाने हिरावून नेले. अशी श्रद्धांजली जिल्हाभरातून अर्पण केली जात आहे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचे ते कट्टर समर्थक होते सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केले आहेत शेतकऱ्यांच्या उसाला हमीभाव एफ आर पी मिळवून देण्यासाठी अनेक कारखान्यांवर आंदोलन उपोषण करुन शेतकर्यांना न्याय मिळवून दिला होता. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर तसेच धर्मराज काडादी यांच्या सिद्धेश्वर साखर कारखान्यासमोर महामूद पटेल यांचे झालेले आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय झाला होता. संपूर्ण आयुष्य या नेत्याने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यात घालवले त्या नेत्याला कोरोनाने हिरावून घेतले.

















