Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मामा, सोलापूरकरांचा तुमच्यावर भरोसा नाय, नाय…. ; तुम्ही ऐका ना, ऐका ना म्हणता, पण तुमचं कुणीच ऐकलं नाय,नाय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोरोनाच्या काळात सोलापूरचा तिसऱ्यांदा पालकमंत्री बदलला, अजितदादा यांच्या मर्जीतील मात्र सुप्रिया ताईंच्या बारामती मतदारसंघातील दत्तामामा भरणे यांना सोलापूरचे तिसरे पालकमंत्री केले, भरणे मामांनी 2020 साली कोरोना काळात अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थिती सांभाळली, प्रशासनाकडून चांगले काम करून घेतले, वर्षभरात भरणे मामांच्या कामाचे कौतुक सर्वांनीच केले. गोड बोलून बोलून त्यांनी सोलापूरची परिस्थिती हाताळली, माध्यमांमधील आपल्या भाच्याना एक मिनिटं ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना, असे म्हणत शांत ठेवले, शेवटी मामा किती दिवस गोड बोलणार तेसुद्धा आता चांगलेच टार्गेट झाले आहेत.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी इंदापूरच्या सिंचन योजनेला तब्बल 500 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली आहे तशीच तरतूद मंगळवेढ्याच्या 35 गावच्या पाणीपुरवठयासाठी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाच पीएमसी पाणी घेतले जाणार असल्याचा विषय समोर आला तिथूनच इंदापूरचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे ते राजकीय लक्ष झाले.

 दत्तामामांना उजनीतून पाणी देण्यास सोलापूरकरांमधून तीव्र असा विरोध झाला मात्र पालकमंत्री भरणे यांनी सोलापूरचे नियोजित एक थेंबही पाणी मी इंदापूरला नेणार नाही असे ठासून सांगतानाच सर्वानाच अंगावर घेतले, हे सर्व होत असतानाच इंदापूर तालुक्यातील दत्तामामाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली, “ये तो अभी ट्रेलर है आगे आगे देखो होता है क्या” अशाने मामांवर सोलापूरकरांचा संताप अधिकच वाढला, उजनीत येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टीएमसी पाणी प्रक्रिया करून इंदापूरला देणार असल्याचा आदेश निघाला त्यानंतर मात्र सर्वच राजकीय पक्ष दत्तामामांवर तोंडसुख घेऊ लागली,  शिवसेना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सरसावली, प्राण जाये पर पाणी ना जाये अशी भूमिका काँग्रेसने घेतली, भाजपने तर नामदेव पायरीवर आंदोलन करण्याचा इशारा दिला, जनतेचा संताप पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही विरोध करावा लागला.

शेवटी दुसऱ्या मामांनी (आमदार संजय शिंदे) या विषयात लक्ष घालत हा विषय थेट ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत नेला आणि पाणी देण्याच्या आदेशाला स्थगिती आणली, यामुळे तर भरणेमामा यांची चांगलीच राजकीय अडचण झाल्याचे चित्र आहे, पत्रकारांसमोर बोलतानाही त्यांचे तोंड पडले होते, एक मिनिटं, ऐका ना,ऐका ना,ऐका ना,असे म्हणून ही कुणी सध्या त्यांचे ऐकत नाही.अशी उजनीच्या पाण्यावरून राजकिय कोंडी भरणे मामांची झाली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सोलापूर महापालिकेची ‘मिशन संजीवनी’ ; आयुक्त पि.शिवशंकर यांची काय आहे संकल्पना

Next Post

विहिरीत पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; कृषी विभागाची विहीर बनली धोकादायक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

विहिरीत पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; कृषी विभागाची विहीर बनली धोकादायक

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002457
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group