जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी एक नवा आदेश काढला, या आदेशांमध्ये आता यापुढे अत्यावश्यक उपचार हवे असणाऱ्या रुग्णांना तसेच गरोदर स्त्रियांच्या प्रसूती वेळी कोविड टेस्ट बाबतची सक्ती होती ती करू नये, यासंबंधी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्व कोविड सेंटर, हॉस्पिटल आणि आरोग्य यंत्रणा यांनी करावे याबाबत महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व प्रांत अधिकारी, आरोग्य अधिकारी महापालिका, सर्व तहसीलदार व सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना हा आदेश पाठवला आहे. याबाबत काँग्रेस युवा नेते शरद गुमटे यांच्यासह इतर अनेकांनी पाठपुरावा केला होता.



















