सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे मंगळवेढा येथील मुक्ताई मूकबधिर आश्रम शाळेतील लहान मुलांना Covid झाल्यामुळे दाखल करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) यांनी त्यांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली व त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारा बाबत माहिती घेतली.
यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता व इतर प्रमुख वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी तसेच मीडिया प्रतिनिधी हजर होते.

























