फिर्यादी अरुण अंबादास केत, वय ७१ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. प्लॉट नं. १०५/१०६, शिवगंगा नगर, भाग-४, पारशी विहीर जवळ, कुमठा नाका, यांच्या घराचे किचनच्या उघडया दरवाज्याचे आत प्रवेश करुन, बेडरुमधील लोखंडी कपाटाची प्लॅस्टीक रॅमधील चावी घेवून कपाटाचा दरवाजा उघडुन कपाटाचे लॉकर उघडुन, ही चोरी करण्यात आली आहे रविवारी भर दुपारी हे घर फोडण्यात आलंय.
१) १५,०००/- रु एक सोन्याची ५ ग्रॅम वजनाची अंगठी
२) ३९,०००/- रु एक सोन्याची १३ ग्रॅम वजनाची गहयातील चैन ३) ४२,२००/- रु एक सोन्याचे १४ ग्रॅम वजनाचे नेकलेस
४) १,०५,०००/- रु एक सोन्याचे ३५ ग्रॅम वजनाचे गळ्यातील गंठण ५) ९,०००/- रु एक सोन्याचे ३ ग्रॅम वजनाचे गळ्यातील दुशी
६) ९,०००/- रु दोन सोन्याचे दीड दीड ग्रॅम वजनाचे कानातील कर्णफुले एकुण ३ ग्रॅम ७) १२,००० /- रु दोन सोन्याची दोन दोन ग्रॅम वजनाचे कानाती झुबे, एकुण ३ ग्रॅम ८) १८,०००/- रु दोन सोन्याचे तीन ग्रॅम वजनाचे कानातील वेल एकुण ६ ग्रॅम
९) ६.०००/- रु एक सोन्याची २ ग्रॅम वजनाची नाकातील नथ १०) २०,०००/- रु एकुण ८० ग्रॅम वजनाचे चांदीचे साहित्य
११) २०,०००/- रु रोख रक्कम एकुण २.९५,२००/- रुपये अशा वर्णनाचा माल चोरून नेला.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास फौजदार माळी हे करत आहेत.


















