सोलापूर महापालिकेच्या वतीने होत असलेल्या पावसाळी स्ट्रॉम लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार कुमार चौक तसेच फॉरेस्ट या भागातील नागरिकांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याकडे केली होती.
ही तक्रार येताच नगरसेविका फुलारे यांनी महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांच्या कानावर ही बाब घातली आणि त्यांना स्पॉटवर बोलावून घेण्यात आले पावसाळी स्ट्रॉम लाईनच्या कामासाठी वापरण्यात येणारी पाईपलाईनचा व्यास लहान आहे नाला पूर्ण भरल्यावर या पाइपमधून पाणी व्यवस्थित निचरा होणार नाही
त्यामुळे नाल्यातील पाणी पुन्हा फॉरेस्ट मधील नागरिकांच्या घरात शिरेल आणि पूर्वीप्रमाणेच नागरिकांना प्रचंड त्रास होईल ही बाब नगरसेविका फुलारे यांनी कारंजे यांच्या निदर्शनास आणून दिली.
तेव्हा लगेच कारंजे यांनी पाईपलाईनचा व्यास वाढवून मोठी पाईपलाईन टाकण्याच्या सूचना केल्या मात्र सध्या हे काम अर्ध्यावर झालेले आहे येणाऱ्या पावसाळ्यात जर तीच अडचण झाली तर सदरची लहान व्यास असलेली पावसाळी स्ट्रॉम लाईन काढून मोठी व्यास असलेली पाईप लाईन घालण्याची ग्वाही नगर अभियंता कारंजी यांनी दिली.
याबाबत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनीही दखल घेतल्याबद्दल महापालिकेचे आभार व्यक्त केले.

















