महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ऐवजी अध्यक्ष पदाची जबाबदारी आक्रमक नेते नाना पटोले यांच्या खांद्यावर दिली नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळते.स्वतः नाना हे आक्रमक अभ्यासू आणि विरोधकांवर तुटून पडणारं व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांची क्रिया सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड अशी कायम आहे. सहसा पक्षाचे कार्यालय म्हटले की, राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रमुख नेते यांच्या प्रतिमा असतात, सोलापूर शहरात काँग्रेस भवन आहे, सोलापूर मध्ये जितके राजकिय पक्ष आहेत त्यात काँग्रेस भवन नावाजलेले आहे, या भवनात शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांचे स्वतंत्र कार्यालय आहेत, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या कार्यालयात ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमा आहेत, पूर्वी थोरात हे प्रदेशाध्यक्ष होते मात्र आता नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत, पटोले हे अध्यक्ष होऊन चार महिने होऊन गेले तरीही पटोले हे जिल्हाध्यक्ष कार्यालयात दिसत नाहीत, यावरून जिल्हाध्यक्षांचे थोरात प्रेम अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.
या उलट शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या कार्यालयात सर्वांना स्थान आहे, सोनिया गांधी, राहुल गांधी, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या ही प्रतिमा लावण्यात आल्या आहेत, यावरून शहर कार्यालय किती अपडेट आहे याचा प्रत्यय येतो. एकीकडे जिल्ह्याच्या कारभारावर स्वतः सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे हे नाराज असल्याची चर्चा काँग्रेस भवनात आहे. दुसरीकडे हे असे चित्र पाहिल्यास नाराजीत आणखीच भर पडेल यात शंका नाही.

















