Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कौतूकास्पद ! मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले जिल्हा परिषदेच्या कोरोनामुक्त गाव अभियानाचे कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 June 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. ७  – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधून आमचा हुरूप आणखी वाढला अशी भावना आज सोलापूर जिल्ह्यातील सहा सरपंचांनी व्यक्त केली. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी राज्यातील विविध सरपंचांनी आपआपल्या परीने उपक्रम राबविले आहे. पुणे, नाशिक व कोकण विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या काही सरपंचाशी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी सोलापुर जिल्ह्यातील डॉ. व्यवहारे यांनी संवाद साधला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आष्टी ता. मोहोळचे सरपंच अमित व्यवहारे, गोपाळपूर ता पंढरपूरचे सरपंच विलास मस्के, चिंचणी ता पंढरपूरच्या सरपंच मुमताज शेख, जकापूर ता अक्कलकोटच्या सरपंच दिपाली आळगी, आंधळगाव ता मंगळवेढाचे सरपंच शांताबाई भाकरे, रहाटेवाडी ता. मंगळवेढा वर्षाराणी गोपाळ पवार उपस्थित होते.

डाॅ. व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी गावात राबविलेल्या उपायांबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, सोलापूर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माझ गाव कोरोना मुक्त गाव व गाव तिथे कोविड सेंटर ही संकल्पना सुरू केली. जिल्हा परिषदेने  विविध पंधरा अभियाने दिली. त्यातून आम्ही गावातील सिल्वर ओक स्कुलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. सेंटर सुरू झाले. त्यावेळेस ३५ पेशंट होते. या पेशंटना सेंटरमधून बाहेर जाऊ दिले नाही. यामुळे संक्रमणाला आळा बसला. त्याचबरोबर कोविड सेंटरमध्ये चांगले उपचार, सकस आहार आणि पेशंटची मानसिक स्थिती चांगली राहिल याकडे लक्ष दिले. मी डाॅक्टर असल्यामुळे मी देखील रूग्णांना तपासत होतो. जिल्हा परिषदेच्या वतीने माझे गाव कोरोनामुक्त गाव  अभियान सुरू केले. यामध्ये आम्ही टेस्टींग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर केला.                      जिल्हा परिषेदेच्या अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे यांची ग्रामीण कोविड सेंटर उभारणीसाठी चांगली मदत झाल्याचे डाॅ. व्यवहारे यांनी सांगितले. 

कोरोनामुक्त गावांना भेटी देणार –  स्वामी 

सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुक्त  सहा गावांना प्रामुख्याने भेटी देऊन त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे श्री स्वामी यांनी सांगितले. ज्या सरपंचानी यात योगदान दिले आहे. ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले. 

आज सरपंचाशी झालेल्या महासंवादाच्या कार्यक्रमात कोरोनामुक्तीबरोबर विविध  नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले ग्रामपंचायतीचे सरपंच यांना प्रातिनिधीक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होण्यासाठी यापूर्वी आवाहन केले होते. मोठ्या संख्येने ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या.

कोरोनामुक्त गाव अभियानाचा चारवेळा नामोल्लेख 

श्री. स्वामी यांच्या संकल्पनेतून माझा गाव कोरोना मुक्त गाव अभियान सुरू केले. त्याची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या भाषणात केली होती. जनतेला संबोधत असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा गौरव केला होता. त्यानंतर माझ गाव कोरोना मुक्त गाव अभियान राज्यात सुरू करणार असल्याचे जाहीर करून शासन निर्णय काढला. सरपंचाशी आज संवाद साधून त्यांनी कोरोनामुक्त गाव अभियानाचा चारवेळा नामोल्लेख केला.  हे अभियान प्रभावीपणे राबविणेचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

इकडे लक्ष द्या महत्वाचे ! सोलापुरातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोवाक्सिनच्या दुसऱ्या डोस बाबत महत्त्वाची माहिती

Next Post

मराठा आरक्षण !! आरक्षणाची 50 टक्के अट शिथील करावी, राज्यांना अधिकार द्यावे ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत झाली ही महत्वाची चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मराठा आरक्षण !! आरक्षणाची 50 टक्के अट शिथील करावी, राज्यांना अधिकार द्यावे ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत झाली ही महत्वाची चर्चा

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996664
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group