Tuesday, October 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आपला “पॅटर्नच” वेगळा आहे, आपण बोलत नाही करून दाखवतो ! आता तर राज्यात आदर्शवत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 June 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“माझे गाव कोरोनामुक्त गाव…, माझे दुकान, माझी जबाबदारी…यानंतर आता माझे मुलं, माझी जबाबदारी….,त्याचबरोबर माझा विद्यार्थी माझी जबाबदारी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची संकल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रत्यक्षात आणली. त्यांची ही संकल्पना आता राज्यभर राबवली जाणार आहे आणि सोलापूर जिल्हा हा माझे मुल, माझी जबाबदारी व  माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी हे दोन उपक्रम सुरू करणारा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे”.

सोलापूर – कोरोनाच्या तिसरे लाटेचे पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला “माझे मुल माझी जबाबदारी “ अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक आहे. असे मत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. 

होटगी येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने “ माझे मुल माझी जबाबदारी” व “ माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” या दोन अभियानाचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करणेत आला. या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले,  ढोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शिक्षणाधिकारी संजय राठोड, जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. पिंपळे, डाॅ. संतोष जोगदंड, गटविकास अधिकारी रंजना कांबळे, होटगीच्या सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी “माझे मुल माझे अभियान “ चा शुभारंभ पालकमंत्री भरणे यांचे हस्ते करणेत आला. 

माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियानामुळे सोलापूर जिल्ह्याचे राज्यात नाव झाले असे सांगून पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या जनसंवाद कार्यक्रमाच्या सोलापूर जिल्ह्यातील या अभियानाचा उल्लेख करून त्या नुसार हे अभियान राज्यात राबविण्याची सुचना केली. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्हा परिषदेने हे “माझे मुल माझी जबाबदारी” हे अभियान तिसरी लाट जेव्हा येईल तेंव्हा प्रभावी ठरणार आहे. दोन लाटेचा चांगला अनुभव असलेमुळे व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. अशा स्थितीत पालकांची जबाबदारी महत्वाची आहे. या अभियानात ९ लाख ७७ हजार बालक व विद्यार्थी यांची तपासणी केली जाऊन त्यांना आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. होटगी साठी स्वतंत्र पोलिस स्टेशनसाठी प्रस्ताव मागवून घेत आहेत. तसेच  व आशा वर्कर यांचे थकीत मानधनाचा प्रश्न सोडविणार आहे. तसेच बालकांच्या आरोग्य तपासणी साठी निधी देणार असल्याची ग्वाही पालक मंत्री भरणे यांनी  दिली.

आशा वर्करचे कोरोना काळातील मानधन द्या – आमदार देशमुख 

……………………………..

या प्रसंगी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, कर्मचारी यांनी स्वत: चे आरोग्य धोक्यात घालून काम केले आहे. सर्व यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत आहे. माझे मुल माझे अभियान यासाठी सीएसआर मधून निधी देणेसाठी मी प्रयत्न करेन. आशा स्वयंसेविका यांचे कोरोना काळातील मानधन तात्काळ देणेत यावे. तसेच वळसंग पोलिस स्टेशन गैरसोयीचे  त्यामुळे होटगी परिसरांत विविध उद्योग व संस्था व कारखाने आहेत. त्यामुळे होटगी साठी स्वातंत्र पोलिस ठाणे करणेची मागणी केली. 

जिल्हयात ९ लाख ७७ बालकांची तपासणीसाठी अभियान – सिईओ दिलीप स्वामी 

——————-

सोलापूर जिल्हयात माझे मुल माझी जबाबदारी या अभियानातून ९ लाख ७७ हजार बालकांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येणे पुर्वी हे नियोजन केले जाणार आहे. नामवंत बालरोग तज्ञ यांचेशी चर्चा करून हे नियोजन केले आहे. लहान मुले कोरोनाला बळी पडू नये यासाठी नियोजन करीत आहेत. ज्या मुलांना धोका अधिक आहे अशा मुलांचा सर्वेक्षण करून आरोग्य पत्रिका तयार केली जात आहे. अभियान स्वरूपात ही मोहिम राबविली जाणार आहे. आता पर्यंत विविध १६ अभियाने राबवून कोरोनाला अटकाव केला आहे. कोरोना होऊच नये साठी दक्षता घेतली जात आहे. असेही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. विस्तार अधिकारी जयश्री सुतार व उप शिक्षिका दिपाली बोराळे यांनी सुत्रसंचालन केले.बाल विकास प्रकल्प अधिकारी ढाकणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक बी डी पाटील, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, यांनी परिश्रम घेतले. 

SendShareTweetSend
Previous Post

अखेर तो “फॅन” भेटलाच अभिनेते सोनू सूद यांना, सोनू सूद यांनी केले हे ट्विट

Next Post

भरणेमामांच्या सत्कारात म्हेत्रे साहेब व महेश अण्णांची ‘इन्ट्री’ ; भरणे-म्हेत्रेंमध्ये ‘गुफ्तगू’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भरणेमामांच्या सत्कारात म्हेत्रे साहेब व महेश अण्णांची 'इन्ट्री' ; भरणे-म्हेत्रेंमध्ये 'गुफ्तगू'

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002380
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group