“नरेंद्र पाटील म्हणाले, कृपया करून माझ्यापुढे पक्षाचे लेबल लावू नका मी केवळ मराठा आहे असे सांगतानाच आता गप्प बसून चालणार नाही मंत्र्यांच्या गाड्या फोडाव्या लागतील असा इशारा देत आपले मराठा समाजाचे आमदार -मंत्री काय अंड्यावर बसले काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.”.
मराठा आरक्षण मोर्चा च्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शनिवारी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा संदर्भात अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला अण्णासाहेब पाटील महामंडळाचीचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख शहाजी पवार अनंत जाधव इंद्रजित पवार राम जाधव किरण पवार राम जाधव अजिंक्य पाटील श्रीकांत घाडगे सोमनाथ राऊत शाम कदम यांच्यासह समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती.



















