![]() |
दीपाली गुरव |
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी माळशिरस तालुक्यातील कोथळे येथील लोकनियुक्त सरपंच दिपाली संतोष गुरव यांची सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील व राज्य सोशल मिडीया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, संपर्क राज्य प्रमुख राहुल उके यांनी नियुक्ती केली.
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र ही नोंदणीकृत सरपंच संघटना आहे, सरपंचांच्या न्याय,हक्क व मागणीसाठी राज्यभर कामकाज ,संघटनेने शासन दरबारी सरपंच मानधनवाढ सारख्या अनेक मागण्या मान्य झालेल्या आहेत.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सरपंच दिपाली संतोष गुरव यांचे सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य सोशल मिडीया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, राज्य कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले,राज्य संपर्क प्रमुख राहुल उके,राज्य महीला उपाध्यक्ष वंदना गुंजाळ, राज्य संघटक आण्णासाहेब जाधव, राज्य सल्लागार हनुमंत सुर्वे, संचालक रामनाथ बोराडे, राज्य महीला संघटक ज्योती ओगड, राज्य कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.