Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! सोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक ? निवडणूक आयोगाची तयारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 June 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रात आगामी काळात येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यासाठी आत्तापासूनच राज्यातल्या प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली असून, यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात महाविकास आघाडी असतानाही  सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने  स्वबळाचा नारा दिला आहे, तर शिवसेना-भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. यातच, आता महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीनं होणार असल्याची तयारी सुरु आहे मात्र सोलापूरात दोन सदस्यांचा एक प्रभाग करण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.

निवडणूक आयोगाने आगामी काळात येणाऱ्या या निवडणुकांच्या दृष्टीने आता तयारी सुरु केली असून, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सोलापूरसह १० मनपांची निवडणूक पुढच्या वर्षी फेब्रुवारीतच होणार आहे, तर कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, वसई-विरार या आधीच मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणूका यावर्षी ऑकटोबरमध्ये होऊ शकतात, याप्रकारचे नियोजन निवडणूक आयोगाकडून केलॆ जात आहे.

त्यामुळे आता, या महापलिकांच्या प्रभागरचनेच्या कामाला येत्या १ जुलैपासून सुरुवात होणार असून, आराखडा तयार करण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. यांनतर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या १ महिन्याच्या कालावधीत, प्रभागरचनेबाबत कुणाला आक्षेप असेल किंवा हरकत असेल, ती नोंदवण्याचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीने करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे, भाजपला याचा फटका बसणार असल्याचा चर्चा आहेत.

याआधी फडणवीस सरकारच्या काळात, चार सदस्यांचा एक प्रभाग असा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा सोलापूरात भाजपच्या लाटेत तब्बल 49 नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेला 21 जागा मिळाल्या होत्या, काँग्रेस राष्ट्रवादीची मात्र दाणादाण झाली, एमआयएम ने 9 जागा जिंकल्या,  मात्र, आता सत्तापालट झाल्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना हा निर्णय आपल्या हिताचा वाटत नसल्याने, त्यांनी प्रभागरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला जात आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेस सोडलेला हा नेता पुन्हा स्वगृही ; राज्याच्या प्रभारींच्या उपस्थितीत प्रवेश

Next Post

ब्रेकींग ! जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश ; ग्रामीण मध्ये लॉकडाऊन कायम ; निर्बंध शिथिल नाहीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश ; ग्रामीण मध्ये लॉकडाऊन कायम ; निर्बंध शिथिल नाहीत

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002372
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group