सोलापूर : आशा सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन आशा सेविकेला 18 हजार व गट प्रवर्तकांना 22 हजार रुपये द्यावे, सामाजिक सुरक्षा द्यावी यासह आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स तसेच लालबावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन सोलापूर च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो महिलांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले
या आंदोलनाला माजी आमदार आडम मास्तर, माकपचे जिल्हा सचिव एडवोकेट एम एच शेख, जिल्हा सचिवा पुष्पा पाटील, नगरसेविका कामिनी आडम यांनी नेतृत्व केले या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे एका अशा सेविकेने कोरणा योद्धा म्हणून प्रतीकात्मक देवीचे रूप धारण केले होते,वंचित बहूजन आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष पल्लवी सुरवसे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला,
दरम्यान आडम मास्तर, पुष्पा पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मागण्यांची माहिती दिली.


















