अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा सिद्धार्थ गायकवाड यांनी आपला सभापती पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे सोमवारी दुपारी दिला. अक्कलकोट पंचायत समितीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता असल्याने पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे सुनंदा गायकवाड यांना सव्वा वर्ष आणि आनंदराव सोनकांबळे यांना सव्वा वर्ष असे सभापतीपद देण्याचे ठरले होते दरम्यान सुनंदा गायकवाड यांचे सव्वा वर्ष पूर्ण झाल्याने सोनकांबळे यांनी राजीनाम्यासाठी तगादा लावला होता, मात्र कोरोना लॉकडाऊन तसेच ग्रामपंचायत निवडणूक, विधान परिषद निवडणूक आणि पंढरपूर विधान सभेची पोटनिवडणुक आचारसंहिता मुळे कामकाज करता आले नसल्याने गायकवाड हे राजीनामा देण्यास तयार नव्हते. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी ही राजीनामा देण्यासाठी सभापती गायकवाड यांचे पती सिद्धार्थ गायकवाड यांना सूचना केल्या होत्या, मागील अनेक दिवसांपासून हे नाराजी नाट्य सुरू होते आपल्याच पक्षातील सभापतीवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळाली, विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती सदस्य आहे गायकवाड यांच्या बाजूनी असल्याची चर्चा होती मात्र नेत्याने दिलेला शब्द पाळत गायकवाड यांनी आपला राजीनामा अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे दिला त्यांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर अक्कलकोट पंचायत समितीमध्ये नव्याने सभापती निवड होणार आहे.


















