एमआयएमचे नेते नगरसेवक तौफिक शेख यांनी बुधवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत इरफान शेख, अजित बनसोडे,इक्बाल वस्ताद, छत्री इनामदार, शोहेब शेख यांची उपस्थिती होती, यावेळी तौफिक शेख आणि त्यांच्या समर्थकांनी जयंत पाटील यांना निवेदन दिले.
यामध्ये प्रभाग 21, प्रभाग 14, प्रभाग 17 व प्रभाग 22 मध्ये विशेष निधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे, यानंतर झालेल्या चर्चेत जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा यांना बोलून निधी देऊ असे आश्वासन दिले. त्याचबरोबर जुलै महिन्यात सोलापूर जिल्ह्याचा दौरा असून त्या वेळी तुमच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा करू असे सांगण्यात आले, त्यामुळे येणाऱ्या जुलै महिन्यात तौफिक पैलवान यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा बार निश्चितच उडण्याची शक्यता आहे.
तौफिक शेख हे मागील एक वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत मात्र अधिकृत प्रवेश कधी होणार याबाबत उलटसुलट चर्चेला ऊत आला होता राष्ट्रवादीत जाणार की पुन्हा शेवटच्या क्षणी एमआयएम मध्येच राहणार असेही बोलले जात आहे. मात्र तोफिक शेख यांचा एकूणच वावर पाहता ते एमआयएमची पतंग सोडून हातात निश्चितच घड्याळ बांधण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.





















