सोलापूर | एकीकडे एमआयएम नगरसेवक तौफिक शेख हे पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आगामी महापालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणूका पूर्ण ताकदीने आणि जास्तीत जास्त लढवण्याची तयारी करताना दिसत आहेत, या दोन नेत्यांच्या भूमिकेवरून मुस्लिम समाज संवेदनशील आहे, बुधवारी तौफिक शेख यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत विशेष निधी तर मागितलाच मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच जाण्याचे संकेत दिले, त्याच दिवशी फारूक शाब्दी यांनी औरंगाबाद येथे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्या निवासस्थानी भेट घेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली, आगामी काळातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणूक लढवून पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक पालिकेत पाठवावे जेणेकरून नागरिकांचे काम करण्यास पक्ष सक्षम होईल. त्यासाठी सोलापूरात योग्यरित्या पक्षाची बांधणी व पक्ष मजबुतीकरण करा,तसेच पक्षाने सोपवलेली जबाबदारी तुम्ही उत्तमरीत्या पार पाडत आहात याचा फायदा पक्षास आगामी काळातील निवडणूकीमध्ये नक्कीच होईल अशा शब्दात सोलापूरच्या टिमचा गौरव कादरी यांनी केलायं.
सोलापूरात अद्यापही प्रभाग रचना झाली नाही, शहर मध्य आणि शहर दक्षिण मतदारसंघात मुस्लिम समाजाचे प्राबल्य पाहता एमआयएम त्याच ठिकाणी फोकस करण्याची शक्यता आहे, 2017 च्या महापालिका निवडणुकीत एमआयएमने 36 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 9 जागा एमआयएम जिंकले, रिझल्ट होता 25 टक्के आता शाब्दी यांचा फोकस हा 40 जागांवर राहणार असल्याची माहिती असून त्यापैकी किमान 25 जागा जिंकून 60 टक्के रिझल्ट देण्याचे नियोजन सुरू आहे.




















