उत्तर सोलापूर : विरवडे येथील शेतकऱ्यांच्या शेतातून वाळू उपसा व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याकडून शेतकरी घेतो प्रति वाहनांकडून २ हजार रुपये या वाळू माफियांकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मोहोळ तालुक्यातील विरवडे येथे सीना नदी मधून वाळू उपसा केला जात आहे. हे वाळू माफिया महसूल विभागाचा व शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अवैध वाळू वाहतूक करत आहे . ही अवैद्य वाळू पाकणी,शिवणी,विरवडे,एमआयडीसी व तिर्हे शिगोली कामती या भागात वाहतूक केली जात आहे या परिसरात जिकडेतिकडे वाळूच वाळू दिसून येत आहे पण या वाळू माफिया वर महसूल खात्याचा आशीर्वाद आहे का? अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे
विरवडे हद्दीतून उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रंदिवस वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. अनेक गावांमध्ये तलाठी,कोतवाल,पोलीस पाटील व महसूल प्रशासन हे डोळे झाकून आंधळे असे पहायला मिळत आहे तरी या वाळू चोरी कडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून ही अवैध वाळू बंद करवी यावी अशी मागणी नागरिकांना मधून होत आहे


















