सोलापूर !राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हे देशाचे पंतप्रधान होतील का असा सवाल उपस्थित करताच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर उत्तर देताना म्हणाले ” रातगेली हिशोबात पोरग नाही नशिबात अशी मिस्कील कोपरखळी मारत आपली पवारांच्या पंतप्रधान होणार आपली भूमिका स्पष्ट केली …..
मागील काही दिवसापासून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे राज्यभर घोंगडी बैठका घेत आहे,त्याच दौऱ्याच्या अनुषंगाने बुधवारी आमदार पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते,दरम्यान पार्क चौक येथील श्रमीक पत्रकार वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार पडळकर हे बोलत होते
शरद पवार हे भावी पंतप्रधान असून मागील तीस वर्षापासून पवार हे स्वप्न बाळगून देशाच्या राजकारणात वारत आहेत, मागील काही दिवसापुर्वी दिल्लीतील काही कोंबड्यानी एकत्रित येऊन मोदींच्या विरोधात मोड बांधण्याचा प्रयत्न केला,थोडक्यात काय तर “रात गेली हिशोबात ,पोरग नाही हिशोबात अशी मिश्किल कोपरखळी मारत पवार पंतप्रधान होण्यावर आपली भुमिका स्पष्ट केली