सोलापूर ! एक रुपयांचा शिक्का गिळलेल्या 5 वर्षाच्या मुलीवर सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी यशस्वी उपचार केले.
उस्मानाबाद शहरात राहणारी समीना पाशा तांबोळी या पाच वर्षाच्या मुलीने एक रुपयाचा शिक्का (नाणे) गिळले होते, ते नाणे गळ्यात तसेच अडकले, त्यामुळे त्या मुलीला काय खाता आणि पिता येत नव्हते, आई वडिलांची घाबरगुंडी उडाली, उस्मानाबाद शहरात घेऊन फिरले त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार झाले नाहीत, शेवटी त्यांना दिसले ते सोलापूर. शहरात आले कुणी ऍडमिट करून घेईना अखेर आले ते सिव्हिल हॉस्पिटलला. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये या मुलीला उपचारासाठी दाखल केले.
ही माहिती अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांना कळाली असता गुरुवारी लगेच त्या मुलीला ऑपरेशन साठी घेण्यात आले तिच्यावर अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर, डॉक्टर अमेय ठाकूर ,डॉक्टर रवी कंदलगावकर यांनी यशस्वीपणे उपचार करून तिच्या गळ्यातील एक रुपयाचा शिक्का बाहेर काढला यामुळे या पाच वर्षाच्या चिमुकलीला एक प्रकारचे जीवदानच मिळाले असे म्हणावे लागेल.
“उस्मानाबाद मधील सिव्हिलमध्ये मशीन नव्हती, आम्ही धाबरून गेलो, आम्ही लगेच सोलापूरच्या सिव्हिलला आलो यांनी लगेच ऑपरेशन करून नाणे काढले, ‘दुवा लगेगी हमारी उनको’ यामुळे माझ्या मुलीने पाणी तरी पिले असे सांगत होते त्या पाच वर्षांच्या समीनाचे आई-वडील पाशा तांबोळी व त्यांची पत्नी यांनी” .
“सिविल हॉस्पिटल मध्ये नव्याने मशनरी दाखल झाल्या आहेत, आम्हाला माहिती मिळाली की एका पाच वर्षांच्या मुलीने 1 रुपयाचे नाणे गिळले असून ते तसेच गळ्यात अडकले आहे, लगेच ऑपरेशनला घेतले, कोणतीही चिरफाड न करता त्या मुलीच्या गळ्यातील शिक्का यशस्वीपणे बाहेर काढला, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेल्या ऑपरेशन मशीन आहेत, त्यामुळे सिव्हिलवर विश्वास ठेवून उपचार करून घ्यावेत.”
डॉ संजीव ठाकूर-अधिष्ठाता





















