मंगेश महेशकुमार बारगळ वय 41, असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तो मोहोळ तालुक्यातील हिंगणी गावात सेवेत होता.
यातील तक्रारदार व त्यांचे इतर दोन नातेवाईकांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन वर्षापूर्वी विहीरी मंजुर झालेल्या होत्या. या मंजुर झालेल्या विहीरींचे कामकाजाचे अनुषंगाने बिलाबाबतचा अहवाल तयार करून तो मस्टरसह पंचायत समिती कार्यालय मोहोळ येथे दाखल करुन बिल काढणेकामी ग्रामसेवक बारगळ यांनी प्रथम प्रत्येक मस्टरला ५०० रुपये प्रमाणे पाच मस्टरला २५०० रुपये असे तिघांचे रुपये ७५०० इतक्या रक्कमेची मागणी केली होती. पडताळणी दरम्यान प्रत्येकी तीनशे रुपये प्रमाणे तीन लाभार्थ्याचे तडजोडीनंतर एकुण ४,५००रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार आलोसे बारगळ याचेविरुध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राजेश बनसोडे, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो पुणे व सुरज गुरव
अप्पर पोलीस अधिक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव पाटील, पोलीस उपअधिक्षक, कविता मुसळे, पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार कोळी, पोलीस नाईक पकाले, शिपाई पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा.