सोलापूर ! एमआयएम पक्षाला सोडण्याच्या तयारीत असलेले आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून सध्या काम करत असलेले नगरसेवक तौफिक शेख यांच्या ताज सोशल ग्रुप व दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ताज कंपौंड मध्ये भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तौफिकभाईंच्या जोडीला आरिफभाई सुद्धा तितक्याच दिमतीने दिसून आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर श्रीकांचना यंनम (ताईं)च्या हस्ते झाले, यावेळी सुधीर (बॉस) खरटमल, सभागृह नेते शिवानंद (अण्णा), नगरसेवक रियाज (भाई)हुंडेकरी, माजी महापौर दिलीप(भाऊ) कोल्हे यांच्यासह सर्वांचं लक्ष वेधून घेत असलेली उपस्थिती ही शिवसेना नगरसेवक व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्याशी जुळत नसलेले मनोज (भाईजी) शेजवाल यांची होती.
हे सर्व येऊन ही तौफिक पैलवान यांची नजर रस्त्याकडे होती, तितक्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष (भाऊ) पवार व महेश (अण्णा) कोठे यांची इन्ट्री झाली, त्यावेळी पैलवानचा चेहरा प्रफुल्लित झाला. तौफिक शेख यांनी या शिबिराच्या माध्यमातून पुन्हा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. इरफान (भाई) शेख, बिस्मिल्ला शिकलगार (आपा), एम डी (चाचा), नगरसेविका शाजियाबानो शेख, नगरसेविका वाहिदाबी शेख, प्रमोद(दादा) गायकवाड, नैरुद्दीन मुल्ला यांनी भक्कम साथ होती. आरिफ भाई आपल्या शिवाला (बाटलीवाला) बोलवायला विसरले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असलेले तौफिक शेख हे कधी एमआयएम सोडतात याकडे पैलवान विरोधकांचे लक्ष लागले आहे. मनोज भाईजी यांची उपस्थिती ही बरीच काही सांगून गेली, भविष्यात महेश कोठेंच्या नेतृत्वाखाली ते ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले तर कुणाला नवल वाटायला नको, बरडे साहेब व गणेशदादा यांच्याशी जुळत नसलं तरी सध्या तरी ते कट्टर शिवसेनेचे व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक असल्याचं दिसून येतंय.



















