“सोलापुरात महिला काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल महागाई व गॅस दरवाढ विरोधात बोंब ठोकून पंतप्रधान मोदी यांना गौऱ्या पाठवण्यात आल्या”.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणा मुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेला सह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे या जीवघेण्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश सरचिटणीस अलका राठोड, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, लता गुंडला, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, प्रमिला तुपलवंडे, मीना गायकवाड, अनिता भालेराव, कल्पना वैनूर,बसंती साळुंखे, जगदेवी कदम यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
दरम्यान हेमा चिंचोळकर व अलका राठोड यांनी मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला, 2014 साली तुम्ही जेव्हा सत्तेवर आला, तेव्हा गॅसचे दर केवळ साडे चारशे रुपये होते. या सात वर्षात ते आता दुपटीने वाढले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला गॅस परवडणारा नाही म्हणून आता पुन्हा गौऱ्यांवर स्वयंपाक करावा लागेल म्हणून आम्ही महागाई, तेल दरवाढ, गॅस दरवाढ यामुळे आता सरकारला आम्ही गौर्या पाठवत असल्याचं सांगितलं.



















