सोलापूर ! सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकाम करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मान्यता देण्यात आली , तर सत्ताधारी पक्षाच्या निर्णयाला नगरविकास मंत्रालयात हरकत घेणार असल्याचा इशारा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिला.
शुक्रवारी महापौर श्रीकांचना यन्नम याच्या अध्यक्षते खाली ऑनलाईन सभा घेण्यात आली होती, यावेळी मागील तीन तहकूब सभेच्या विषयावर चर्चा करण्यात आली, यात पालिकेच्या मालकीच्या बारा शाळेच्या इमारती मैदाने शैक्षणिक दृष्ट्या देणे, सैन्या कडील निकामी झालेला रणगाडा घेणे, कोरोना काळात झालेल्या खर्चास मान्यता देणे आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकाम करण्याच्या कामाला परवानगी देण्याच्या विषयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी.
भाजपाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या प्रशासकीय प्रस्तावाला मान्यता देऊन राजकारण करत आहेत, भाजपाच्या नेत्याना लिंगायतची मते पाहिजे, तर मग लिंगायत समाजाचा कारखाना का चालत नाही असा सवाल उपस्थित करत सत्ताधा-यानी घेतलेल्या निर्णयाला नगरविकास मंत्रालयात हरकत घेणार असल्याचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते किसन जाधव, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक सुभाष शेजवाळ यांनी सांगीतले.
एकंदरीतच चिमणीच्या विषयावरून ऑनलाईन सभेत मोठा गोंधळ झाल्याचे पाहावयास मिळाले बऱ्याच नगरसेवकांना चिमणीच्या विषयावर बोलायचे होते परंतु ऑनलाइन नेट प्रॉब्लेम मुळे अनेकांचा आवाज दाभला गेला अशी चर्चा नगरसेवकांमध्ये होती..



















