सोलापूर ! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत, सकाळच्या सुमारास त्यांनी शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी भानुदास माळी यांनी महाराष्ट्रातून ओबीसी समाजात काँग्रेस प्रति चांगला प्रतिसाद आहे जिल्ह्याजिल्ह्यात माझे दौरे सुरु आहेत हजारोच्या संख्येने कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगत पक्षाची भूमिका स्पष्ट केली



















