सोलापूर !राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दमदार अजित दादा पवार या गीताचे शानदार लॉन्चिंग करण्यात आले. या गीताची संकल्पना गीत आणि निर्माते हे स्वतः कार्याध्यक्ष संतोष पवार आहेत अतिशय दमदार असे गीत असून गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी याचे गायन केले आहे, संगीतकार जब्बार धनंजय आहेत, मेहबूब रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये याचे ध्वनिमुद्रण करण्यात आले आहे, ग्राफिक्स अमित रोडगे यांचे तर संकलन मोशन स्टुडिओचे सचिन जगताप यांनी केले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री दत्तामामा भरणे, आमदार संजय मामा शिंदे, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष उमेश पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष महबूब खान पठाण, जिल्ह्याचे निरीक्षक सुरेश घुले, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, दीपक साळुंखे, माजी महापौर मनोहर सपाटे, एमआयएमचे नगरसेवक तोफिक शेख, रिपाई पीजी गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या उपस्थितीत या गीताचे लॉन्चिंग झाले. येणाऱ्या 22 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा वाढदिवस साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात लॉन्च झालेल्या या गीताने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं आहे.
अतिशय दमदार आणि बहारदार असे हे गीत झाले आहे शहराचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी आपले अजितदादा प्रेम या गीतातून दाखवून दिले स्टेज वरील स्क्रीनवर हे गीत लागल्यानंतर उत्साहित झालेल्या कार्यकर्त्यांनी संतोष पवार यांना डोक्यावर घेऊन नाचले पहा तो क्षण कसा होता..


















